शाहुवाडी तालुक्यात ४१ पैकी ८ ग्रामपंचायत बिनविरोध
शाहुवाडी : शाहुवाडी तालुक्यात ४१ ग्रामपंचायत पैकी ८ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून, पेरीड ग्रामपंचायत ची निवडणूक फक्त एका जागेसाठी लागली आहे.

एकूण निवडणूक लागलेल्या ४१ ग्रामपंचायत पैकी ससेगाव, सोंडोली, गिरगाव, जांबूर, अनुस्कुरा, वारूळ, वडगाव, कुंभवडे, या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

शाहुवाडी तालुक्यात इतर ग्रामपंचायत नेहमीप्रमाणे स्थानिक नेत्यांमध्ये लढती सुरु आहेत. दरम्यान काही गावांमध्ये स्थानिक पातळीवर सुद्धा युती होवून नेते मंडळी स्थानिक पातळीवर निवडणुका लढत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी गावपातळीवर नेत्यांना बाजूला ठेवून, ग्रामस्थांनी निवडणूक हातात घेतली आहे. मतदारांची मनधरणी करण्यासाठी रात्री जागू लागल्या आहेत. तर काही ठिकाणी बुजुर्गांच्या सोबत तरुणाई उतरत असल्याचे दिसत आहे.


शाहुवाडी तालुक्यात गावं सतर्क झाली आहेत, तर प्रशासन जागरूक झाले आहे. कारण ग्रामपंचायत निवडणूक इतर निवडणुकीपेक्षा वेगळी असते, याची संवेदनशीलता प्रशासनाला आहे.