शाहुवाडी पोलिसांची गणेशोत्सव बाबत बैठक बांबवडे त संपन्न
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं ग्रामपंचायत बांबवडे च्या सभागृहात शाहुवाडी पोलीस ठाणे यांच्यावतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बांबवडे येथील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक संपन्न झाली या बैठकीत आदर्श गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.

यावेळी शाहुवाडी पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी श्री विजय पाटील यांनी मंडळांना स्पीकर चा आवाज नियंत्रित ठेवणे, मंडपामुळे वाहतुकीला अडचण होणार नाही, याची दक्षता घ्या. तसेच गणेशोत्सव काळात कोणाशीही वाद होणार नाही. याची काळजी घ्या. गणेशोत्सव काळात आवाज रात्री बारा वाजल्यानंतर बंद होणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या सर्व अटी आणि नियमांची माहिती दिली. मंडळांनी ऑनलाईन परवानगी काढणे, तसेच मंडपामध्ये व्हिजीट बुक ठेवणे,गरजेचे आहे. असे अनेक नियम मंडळांना सांगितले.

यावेळी मंडळांच्यावतीने विचारलेल्या प्रश्नांना श्री पाटील यांनी उत्तरे दिलीत.

यावेळी पोलीस संभाजी पाटील, दिगंबर चिले, तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.