शाहुवाडी पोलीस ठाणे चा फोन नं. सदाबंद अवस्थेत ?
बांबवडे : शाहुवाडी पोलीस ठाणे चा फोन नं. सदाबंद अवस्थेत असून, पोलीस खात्यासारख्या महत्वाच्या कार्यालयाला फोन नं नसावा, हि शाहुवाडी तालुक्यासाठी शरमेची बाब आहे. याचा फटका तालुक्यातील गोरगरीब जनतेला बसत आहे. त्याचबरोबर पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा बसत असेल. परंतु ते बिचारे काय बोलणार ? वरिष्ठांसमोर त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागत असेल.


शाहुवाडी पोलीस ठाणे शाहुवाडी येथील लँड लाईन फोन गेली अनेक महिने बंद अवस्थेत आहे. परंतु याचा कोणंच विचार करीत नाही. सध्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा कारभार वयैक्तिक मोबाईल क्रमांकावरून सुरु आहे. परंतु हे असे का ? या प्रश्नाचं उत्तर मात्र कुणाकडेही नाही. फोन नादुरुस्त आहे. एवढेच कारण पुढे येते. अनेक मंत्री महोदयांचे फोन बिल शासन भरत असेल. पण दुर्गम अशा शाहुवाडी तालुक्याच्या पोलीस ठाण्याचे बिल भरले जात नाही का ? भरले गेले असेल , तर फोन बंद का ? असे अनेक प्रश्न सामान्य जनतेच्या पुढे येत आहेत. याचा पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा फटका बसतो. ” मी शाहुवाडी पोलीस ठाण्यातून बोलतोय “, असे म्हटल्यावर पुढचा म्हणतो कशावरून ? मग तुमचा बक्कल नं. काय ? , असे अनेक प्रश्न पोलिसांना ऐकावयास लागत असतील. आणि ते बरोबर सुद्धा आहे. कारण जर तुम्ही तुमच्या मोबाईल क्रमांकावरून फोन केला, तर तुमच्या पोलीस ठाण्याचे नाव काही समजणार नाही.

या सगळ्या गोष्टी फक्त पोलीस ठाण्याचा फोन बंद असल्याने सुरु होतात. यासाठी पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी यावर विचार करून शाहुवाडी पोलीस ठाण्याचा फोन नं. सुरु करावा, जेणेकरून सामान्य जनतेला पोलिसांशी थेट संवाद साधता येतील, अन्यथा मधले ” पंटर ” वाढतच राहतील, याची नोंद घ्यावी.