राजकीयसामाजिक

शाहुवाडी भाजप कार्यकारिणीची बैठक शाहुवाडी त संपन्न


मलकापूर प्रतिनिधी (रोहित पास्ते ) : शाहुवाडी तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी बैठक शाहुवाडी येथील विश्रामगृहात संपन्न झाली.


या बैठकीत अनेक ठराव मांडण्यात आले, व ते मंजूर देखील करण्यात आले. दरम्यान भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. याबाबत शोक व्यक्त करण्यात आला. हर घर तिरंगा, तसेच पक्ष विस्तारासाठी पक्षात नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रवेश देणे, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रभारी व मलकापूर नगरपरिषद निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांचा आढावा, या बैठकीत घेण्यात आला.


जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात अनेक इच्छुकांनी आपली उमेदवारी मागितली. या बैठकीसाठी शाहुवाडी तालुका जिल्हा परिषद, पंचायत समिती चे प्रभारी व मलकापूर नगरपरिषद चे माजी उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर व तालुका अध्यक्ष विजय रेडेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी तालुका सरचिटणीस संजय खोत, विलास राऊत यांनी पक्षाचे अनेक विषय यावेळी मांडले.


या बैठकीसाठी उदय कोकरे – देसाई, भारत गांधी, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप पाटील, हरिभाऊ पाटील, डॉ.संपत भोसले, बाळासो कारंडे, सर्जेराव कांबळे, रमेश चव्हाण, महिपती पाटील, कृष्णा दिंडे, महेंद्र दळवी, सचिन लाड, विनायक कदम यांच्यासह भाजप चे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!