शाहुवाडी मनसे तर्फे महामानवांना विनम्र अभिवादन
मलकापूर प्रतिनिधी (रोहित पास्ते ) : मलकापूर तालुका शाहुवाडी इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी शाहुवाडी पंचायत समिती इथं असलेल्या भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, अभिवादन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन मलकापूर येथे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

जयंती निमित्त अनाथ आश्रम शाहुवाडी इथं खाऊ वाटप करण्यात आला.

या कार्यक्रम प्रसंगी सहकार सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सतीश तांदळे, कामगार सेना कोल्हापूर जिल्हा सचिव सुरज गोसावी, तालुका उपाध्यक्ष प्रवीण कांबळे, तालुका उपाध्यक्ष संदीप कांबळे, मलकापूर शहर अध्यक्ष अजय गुरव, तसेच महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.