शाहुवाडी येथील दोन दुचाकींचा अपघात : दोघेजण जखमी
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी येथील शाहुवाडी पंचायत समिती समोरील रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून, दोघेजण जखमी झाले आहेत. जखमींना मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शाहुवाडी पंचायत समोर मलकापूर दिशेहून शाहुवाडी कडे येणाऱ्या दुचाकीची समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसून अपघात झाला आहे. या अपघातात ससेगाव तालुका शाहुवाडी येथील करण उत्तम गोसावी वय १९ वर्षे, अर्जुन पांडुरंग गोसावी वय २१ वर्षे हे दोन्ही तरुण जखमी झाले आहेत. हि घटना काळ रात्री ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान घडली असल्याचे समजते.