शाहुवाडी राष्ट्रवादी ची ” वेट अँड वॉच ” ची भूमिका – श्री मानसिंगराव गायकवाड दादा
बांबवडे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची शाहुवाडी तालुक्याची ” वेट अँड वॉच ” ची भूमिका असल्याची, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नेते मानसिंगराव गायकवाड दादा यांनी आज दि. ५ जुलै रोजी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये उभी फुट पडली असून, शाहुवाडी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका काय ? असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेस चे मानसिंगराव गायकवाड दादा यांना विचारणा केली असता, कार्यकर्त्यांशी चर्चा अद्याप झालेली नसून, लवकरच कार्यकर्त्यांची करून, आपण निर्णय घेवू, असे मत श्री मानसिंगराव गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.