शिंदेवाडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या…
बांबवडे: शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे पैकी शिंदेवाडी येथील श्रीकांत रामचंद्र शिंदे (वय वर्षे 42) या होतकरु शेतकऱ्या ने आपल्या घरमागील शेतातील झाडाला दोराने गळफास लावून घेवून आत्महत्या केली. या घटनेची शाहूवाडी पोलीस ठाणे मध्ये नोंद करण्यात आले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत शिंदे दिनांक 22 मे रोजी दिवसभर आपल्या शेतात मशागतिचे काम करीत होते. रात्री घरी गेल्यानंतर अचानक ते आपल्या घरातून निघून जाऊन त्यांच्या शेताजवळ असलेल्या आंबिरा ओढ्याजवळ असलेल्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेवून त्यांनी आत्महत्या केली. श्रीकांत हे शेती मध्ये आवड असलेले होतकरु शेतकरी होते. आपल्या शेतात वेगवेगळी पिके घेवून प्रयोग करण्याचा त्यांचा नेहमीच ध्यास होता. होतकरु शेतकरी असल्याने त्यांची चांगली किंमत होती, यामुळे त्यांची आत्महत्या ही समाजाला चटका लावून गेली.
श्रीकांत शिंदे हे सेवानिवृत्त सहा. फौजदार रामचंद्र शिंदे यांचे चिरंजीव होते, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गुरुनाथ शिंदे यांचे वडिल बंधू होते. त्यांच्या पश्चात आई,वडिल भाऊ ,पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार दि. 24 मे रोजी सकाळी 10 वाजता सोनवणे पैकी शिंदेवाडी येथे आहे.
या घटनेचा अधिक तपास हवलदार सुधीर अपराध करित आहेत .