शिंपे चे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना : गोरक्ष सकटे
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील शिंपे येथील माऊली स्पोर्ट्स क्लब शिंपे च्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती स्पोर्ट्स क्लब चे प्रशिक्षक गोरक्ष सकटे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

ते पुढे म्हणाले कि, गोवा इथं होणाऱ्या युथ नॅशनल स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या वतीने होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शिंपे येथील वर्षाराणी कृष्णा पाटील (फ्री स्टाईल कुस्ती ), तेजस्विनी बळवंत पाटील (८०० मी. धावणे ), विनायक शिवाजी पाटील (८०० मी. धावणे ) हे खेळाडू स्पर्धेसाठी गोवा इथं रवाना झाले आहेत. त्यांना राष्ट्रीय प्रशिक्षक श्री गोरक्ष सकटे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिंपे ग्रामस्थ व पालकांनी त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.