शिंपे च्या तरुणाच्या कर्तुत्वाची गगनभरारी …
सरूड प्रतिनिधी : शाहुवाडी तालुका हा रत्नांची खाण आहे. इथं कर्तुत्वाला खूप मोठी किंमत आहे. इथं प्रत्येक तरुणाच्या किंवा तरुणींच्या पंखात गगन भरारी घेण्याचे सामर्थ्य आहे. हे अनेकवेळा इथल्या तरुणांनी सिद्ध केले आहे. आजही शिंपे तालुका शाहुवाडी येथील संपत पाटील या तरुणाने आपल्या कर्तुत्वाच्या बळावर कमी वयात जनरल मॅनेजर या पदावर गरुड भरारी घेतली आहे. अशा संपत पाटील यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने हार्दिक अभिनंदन.

शाहुवाडी तालुक्याची माती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती आहे. कर्तुत्व हे इथल्या रक्तात रुजलेले गुण आहेत. आणि बीज एकदा रुजलं, कि ते मोठ्या जोमाने उगवतं. हे संपत पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. ते पालघर जिल्हा इथं खाजगी कंपनीत नोकरीला आहेत. गेल्या काही वर्षात लिपिक पदावरून त्यांची जनरल मॅनेजर पदावर पदोन्नती झाली आहे. कमी वयात मिळवलेले यश हे त्यांच्या कष्टाची आणि कर्तुत्वाची जाणीव करून देत आहे.

त्यांच्या या यशाबद्दल शिंपे ग्रामस्थ व पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुनश्च संपत पाटील यांचे मनापासून अभिनंदन.