शिंपे परिसरात बिबट्याचा वावर ?
बांबवडे : शिंपे तालुका शाहुवाडी येथील परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास गेल्या आठ दिवसांपासून येत आहे. यामुळे शिंपे, वडगाव ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिंपे, येथील नामदेव पाटील यांच्या कुत्र्याला बिबट्याने ओढून नेल्याचे ग्रामस्थांतून चर्चेला येत आहे. तसेच वडगाव येथील ग्रामस्थांना या बिबट्याचे दर्शन झाल्याचे चर्चेत येत आहे.

दरम्यान या बाबत शिंपे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत शिंपे कडे तक्रार केली होती. याबाबत ग्रामपंचायत शिंपे कडे संपर्क केला असता, ग्रामसेवक यांनी उत्तर दिले नाही. तर ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली असता, कार्यालय बंद असल्याचे निदर्शनास आले.