प्रशासकीयसामाजिक

शिंपे येथील वृक्षतोड उर्जा प्रकल्पासाठी- शाहुवाडी गट विकास अधिकारी

बांबवडे : शिंपे तालुका शाहुवाडी येथील झालेली वृक्षतोड , हि सौर उर्जा प्रकल्पासाठी असून, याबाबत ग्रामपंचायत ने सदर घटनेची माहिती प्रसार माध्यमे, तसेच ग्रामस्थांना देणे गरजेचे आहे. असे मत शाहुवाडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मंगेश कुन्चेवर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.
यावेळी श्री कुन्चेवार पुढे म्हणाले कि, मुख्यमंत्री स्तरावरून सौर उर्जा प्रकल्प मंजूर झाला आहे. हा प्रकल्प सौर उर्जा वितरण च्या माध्यमातून मंजुर झाला आहे. येथील असलेल्या ३० एकर गायरानात हा प्रकल्प उभा राहणार आहे. या जागेत असलेल्या झाडांच्या तोडणीसाठी वन विभागाकडून मंजुरी घेण्यात आली आहे. असे देखील गट विकास अधिकारी यांनी सांगितले. दरम्यान सदर प्रकल्पाची माहिती ग्रामपंचायत ने देणे गरजेचे होते. त्यांनी तीमाहिती प्रसार माध्यमे तसेच ग्रामस्थांना न दिल्याने गैरसमज पसरत आहे. याबाबत ग्रामपंचायत ला ती माहिती ग्रामस्थांना देण्याविषयी आदेश देणार आहोत. असेही श्री कुन्चेवार यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!