शिंपे येथील शिवांजली व शिवाली या बहिणींची नवोदय साठी निवड
मलकापूर प्रतिनिधी : शिंपे तालुका शाहुवाडी येथील शिवांजली कृष्णा शिंदे, व शिवाली कृष्णा शिंदे या जुळ्या बहिणींची पलूस जिल्हा सांगली येथील नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. या दोघींचेही साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने हार्दिक अभिनंदन .

शिवांजली व शिवाली या दोघी सख्ख्या जुळ्या बहिणी असून,या दोघींचीही नवोदय साठी निवड झाली आहे. राज्यातील हि पहिलीच घटना असल्याचे समजते.

या दोन्ही विद्यार्थीनींना मोहन पाटील, जयवंत पोवार, सुमन काळे देशमुख, वडील कृष्णा शिंदे, आई राधिका शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. आई राधिका शिंदे यासुद्धा कागल जिल्हा कोल्हापूर येथील नवोदय च्या विद्यार्थिनी आहेत.: