” शिंपे विद्यामंदिर “च्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा -कु.अनुष्का ची शिंगणापूर क्रीडा प्रशाला साठी निवड
बांबवडे : शिंपे तालुका शाहुवाडी येथील प्राथमिक विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या यशामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या शाळेची विद्यार्थिनी कु. अनुष्का धोंडीराम पाटील हिची खो-खो या क्रीडा प्रकारातून राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर इथं निवड झाली आहे. याचबरोबर कु.वेद संपत पाटील हा कुस्ती क्रीडा प्रकारात, तर पार्थ शंकर पाटील हा विद्यार्थी खो -खो क्रीडा प्रकारात प्रतीक्षा यादीत आहेत.

याबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.

यासाठी श्री. भानुदास शंकर पाटील, व शरद ईश्वरा लाड या क्रीडा मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले.

याचबरोबर मुख्याध्यापक श्री अशोक पेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गशिक्षक सर्जेराव काळे, तसेच शिक्षकवृंद श्री बाळासाहेब सणगर, श्री हरी डंबे, सौ. जयश्री कुंभार, सौ राधिका शिंदे यांनी देखील विद्यार्थ्यांसाठी परिश्रम घेतले.

दरम्यान शाळा व्यवस्थापन समिती विद्यामंदिर शिंपे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.