शिंपे सेवा संस्था निवडणुकीत अजित पाटील यांना ठामपणे योगदान – श्री संपत पाटील शिंपेकर
बांबवडे : शिंपे तालुका शाहुवाडी येथील ज्योतिर्लिंग सह. वि.का.स. सेवा संस्था ची सर्वार्त्रिक निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात येत असून, या निवडणुकीत सत्ताधारी सदस्य मंडळ व उदय साखर चे संचालक अजित गुंगा पाटील ( आप्पा ) यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहणार आहोत, आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला सहकार्य करणारे सदस्य मंडळ निवडून आणणार आहोत, असे मत येथील युवा कार्यकर्ते श्री संपत पाटील शिंपेकर यांनी यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.

शिंपे येथील ज्योतिर्लिंग विकास सेवा संस्थेची सार्वत्रिक निवडणूक साठी एप्रिल मध्ये मतदान होणार आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत अजित पाटील यांनी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सहकार्य केले आहे. शेतीला लागणारी कर्ज व्यवस्था केडीसिसी बँकेच्या माध्यमातून पुरविली आहेत. तसेच शेतकऱ्याला शेतीसाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य श्री अजित पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी गेल्या पाच वर्षात केले आहे.

अशा कामसू मंडळींच्या पाठीशी उभे राहून, आपला शेतकरी कसा जपला जाईल, यासाठी आमचे सर्वतोपरी योगदान विद्यमान संचालक आणि पदाधिकारी यांच्या पाठीशी ठामपणे राहणार आहे, यात कोणतीही शंका नाही. कारण शेतकरी जगला, तर गाव जगेल, अशी आमची भूमिका आहे, असेही श्री संपत पाटील यांनी याविषयी बोलताना सांगितले. त्यांच्यासोबत सदाशिव तुकाराम पाटील, आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.