शिराळ्यातील प्रसिद्ध व्यापारी मारुती कुंभार निधन : २ ऑगस्ट रोजी उत्तर कार्य
शाहुवाडी प्रतिनिधी : अंत्री खुर्द तालुका शिराळा येथील जुन्या काळातील नामांकित पैलवान व मुंबई येथील प्रसिद्ध फळ व्यापारी मारुती गणपती कुंभार वय ७८ वर्षे यांचे आकस्मिक निधन झाले.
ते शिराळा पंचायत समिती चे माजी सदस्य तुकाराम कुंभार यांचे बंधू होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, सून, दोन भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.
उत्तर कार्य दोन ऑगस्ट २०२० रोजी आहे.