सामाजिक

शिराळ्यात पावसामुळे वाहतूक विस्कळीत

शिराळा प्रतिनिधी (संतोष बांदिवडेकर):शिराळा तालुक्यात गेले तीन दिवसा पासून पावसाने सुरुवात केली आहे.अधून मधून वादळी वारे सुटत आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उनमळून पडतं आहेत. पावणे दहा वाजण्याच्या सुमारास शिराळा इस्लामपूर रस्त्यावर पोलीस लाईन समोर झाड उन्मळून पडल्याने या मार्गांवरील एक तास वाहतून ठप्प झाली होती.
त्यामुळे इस्लामपूर कडून येणाऱ्या वाहनाना आय.टी.आय येथील बाह्यवळण रस्त्यावरून कापरी फाटा ते कापरी नाका असा वळसा घालून यावे लागत होते.तर शिराळा कडून इस्लामपूरकडे जाणाऱ्या वाहनाना शिराळा बस्थानक,कापरी नाका ते कापरी फाटा मार्गे आय.टी.आय.बाह्यवळण रस्त्याने इस्लामपूरकडे जावे लागत होते.
दरम्यान याची माहिती शिराळा पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलीस अमोल साठे, अभिजित नायकवडी, अनुज पाटील यांनी इतर ग्रामस्थांच्या मदतीने ते झाड रस्त्याच्या कडेला काढून घेतले.त्यानंतर त्या मार्गांवरून वाहतूक सुरु झाली.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!