शिवशंभूंचे विचार स्मरणात राहावे : धर्मवीर छत्रपती शंभू राजे यांच्या बलिदान मासाची सांगता
मलकापूर प्रतिनिधी (रोहित पास्ते ) : मलकापूर तालुका शाहुवाडी इथं धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त शहरातून मूक पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हि पदयात्रा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने काढण्यात आली.

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी आपल्या हिंदू धर्मासाठी बलिदान केले. यासाठी त्यांनी अनंत यातना सहन केल्या. त्यांची आपणास आठवण राहावी , म्हणून फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या पर्यंत हा बलिदान मास पाळला जातो.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान मास च्या अनुषंगाने मलकापूर येथील सुभाष चौकातून सायंकाळी संपूर्ण नगरीतून प्रेरणा मंत्र,आणि ध्येयमंत्र घेवून हि मूक पदयात्रा काढण्यात आली. यावेळी प्रत्येकाने छत्रपती संभाजी महराजांना वंदन केले/ शिव शंभूंचे विचार आचरणात तरुण पिढीने आणावे, यासाठी या पदयात्रेचे दरवर्षी आयोजन केले जाते. या पदयात्रेस मोठ्या संखेने प्रतिसाद मिळाला.