शिवसेनेचा ” टायगर ईज बॅक “
बांबवडे : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्यामुळे, शिवसेनेमध्ये अवघ्या महाराष्ट्रात चैतन्य निर्माण झाले आहे. ” टायगर ईज बॅक ” अशी भावना शिवसेनेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी ईडी ने अटक केली होती. त्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप संजय राऊत यांच्यावर ठेवण्यात आला होता. दरम्यान १०२ दिवसानंतर त्यांना आज जामीन मंजूर झाला असून, तुरुंगाच्या बाहेर येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.


त्यामधून ” टायगर ईज बॅक ” ची भावना शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शिवसैनिकांमध्ये पुनश्च नवचैतन्य निर्माण झाले आहे.