शिवसेनेचे दिनकरराव लोहार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील करुंगळे येथील शिवसेनेचे शाहुवाडी तालुका उपप्रमुख श्री दिनकरराव लोहार यांचा आज दि.१८ मे रोजी वाढदिवस करुंगळे इथं संपन्न होत असून, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी करुंगळे इथं सायंकाळी ७.०० वाजता उपस्थित राहणार आहेत. त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आज वाढदिवसानिमित्त शाहुवाडी ते पावनखिंड शौर्यपीठ पावनखिंड शिवदौड आश्रम शाळेतील मुलांना भोजन देण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण रुग्णालय मलकापूर येथील रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम देखील राबविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सत्यजित पाटील ( आबा ), शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी, पंचायत समिती सदस्य विजय खोत, शाहुवाडी तालुकाप्रमुख दत्तात्रय पोवार, पन्हाळा तालुकाप्रमुख बाबा पाटील, करुंगळे गावचे सरपंच माधव कळंत्रे, तंटामुक्त अध्यक्ष एस.बी. पाटील सर, सेवा संस्थेचे चेअरमन दिलीप वीर, व शिवसैनिक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती मिळत आहे.