शिवसेनेच्यावतीने पोलिसांना मास्क, सॅनिटायझर साहित्याचे वाटप
बांबवडे : शिवसेनेचे शाहुवाडी तालुका संपर्क प्रमुख आनंदराव भेडसे यांच्या सहकार्यातून शिवसेनेच्यावतीने उपजिल्हाप्रमुख नामदेवराव गिरी यांच्याहस्ते शाहुवाडी पोलिसांना मास्क, सॅनिटायझर आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्याचे वितरण शाहुवाडी पोलीस ठाणे इथं करण्यात आले.
आनंदराव भेडसे हे सध्या उद्योग व्यवसायानिमित्त मुंबई इथं स्थायिक आहेत. परंतु ते मुळचे शाहुवाडी तालुक्यातील सावर्डे बु. येथील आहेत. मुंबई, शाहुवाडी इथं ते शिवसेनेच्या माध्यमातून समाजकार्यात वेळोवेळी सहभागी असतात.
सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा प्रभावी काम करीत आहे. अशा पोलीस बांधवांना कृतज्ञता म्हणून, तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या अनुषंगाने या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी कोल्हापूर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेवराव गिरी, तालुकाप्रमुख दत्ता पोवार, सचिन मूडशिंगकर, विजय लाटकर, व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.