शिवसेनेच्यावतीने ” सावे बालिका अत्याचार ” प्रकरणी निषेध
बांबवडे : शाहुवाडी तालूक्यातील सावे इथं घडलेल्या घृणास्पद कृत्याबद्दल त्या आरोपीला फाशी द्या, अशा घोषणा देत शाहुवाडी तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने विशेषतः महिला शिवसेनेच्या वतीने बांबवडे दूरक्षेत्र पोलीस ठाणे च्या दारात घोषणा देत निषेध केला.

तालुक्यातील सावे येथील तीन वर्षाच्या बालिकेवर तेथीलच पंचावन्न वर्षाच्या नराधमाने दिवसा ढवळ्या अत्याचार केला. या घृणास्पद घटनेने अवघा शाहुवाडी तालुका हादरून गेला आहे. या घटनेचा निषेध करावा, तितका थोडा आहे. यातील आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावे, अशी अवघ्या जनमानसाची अपेक्षा आहे. यासाठी शिवसेनेच्या वतीने हि निषेध फेरी काढण्यात आली. आणि तशा आशयाचे निवेदन येथील पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना देण्यात आले.


यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी ,बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील बापू, शाहुवाडी व पन्हाळा तालुका संपर्क प्रमुख आनंदराव भेडसे, उपतालुका प्रमुख दिनकर लोहार, योगेश कुलकर्णी, सचिन मूडशिंगकर, विजय लाटकर, सचिन चौगुले, रवी निंबाळकर, विजय कांबळे, महिला आघाडी प्रमुख अलका भालेकर, सुवर्णा दाभोळकर, संगीता झेंडे, युवती तालुका प्रमुख पूनम भोसले, प्रिया कुंभार, शिंत्रे मॅडम, आदी शिवसैनिक उपस्थित होते..