शिवारे इथं बिबट्याच्या हल्ल्यात ५ शेळ्या ठार
बांबवडे : शिवारे तालुका शाहुवाडी येथील एका शेतकऱ्याच्या शेड वर बिबट्याने हल्ला केला असून, यामध्ये पाच शेळ्या ठार झाल्या आहेत.
शिंपे, सरूड, वडगाव नंतर शिवारे इथं बिबट्याने आपला मोर्चा वळवला आहे. शिवारे येथील शेतकरी नामदेव दादू पाटील यांच्या वस्तीवर बिबट्याने हल्ला केला. दरम्यान या हल्ल्यात चार शेळ्या जागीच ठार केल्या,तर एक शेळी बिबट्याने ओढून नेली आहे.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला आहे. काही दिवसांपूर्वीच एसपीएस न्यूज या संदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती.दरम्यान कोणतीही तक्रार आलेली नाही अशी उत्तरे प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी दिली होती. परंतु आज प्रत्यक्ष हल्ला झाल्यानंतर तरी कर्मचारी मान्य करणार का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान वनविभाग याबाबत काय करणार असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.