शिवारे त बिबट्या सदृश्य प्राण्याने मेंढरांवर केला हल्ला
बांबवडे: शिवारे तालुका शाहुवाडी येथील मेंढपाळांच्या तळावर रविवार दि.५ मे रोजी रात्री च्या दरम्यान बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात एक मेंढी ठार झाली. असल्याचे समजते. यामुळे मेंढपाळांच्या त भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचे वृत्त समजताच यशवंत क्रांती संघटनेने घटनास्थळाला भेट दिली . यासोबत त्यांच्याबरोबर रात्र तेथेच काढल्याने मेंढपाळांना आधार मिळाला.
याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, शिवारे येथील शेतकरी सुभाष विष्णू पाटील यांच्या शेतात मेंढपाळ विष्णू भिकाजी माने यांची मेंढरे बसायला होती. रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान बिबट्या सदृश्य प्राणी आल्याची चाहूल मेंढरांना लागली. त्यामुळे गोंधळ उडाला. या घटनेने मेंढपाळ सावध झाले. त्यांनी बॅटरी च्या प्रकाश झोतात एक प्राणी मेंढी ला ओढून नेताना पहिले. मेंढपाळ एकटेच असल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून गोधळ न करता यशवंत क्रांती संघटनेला मदतीसाठी विनंती केली.
यावेळी यशवंत क्रांती संघटनेचे दत्तात्रय मुडळे, अशोक मुडळे, यशवंत संघटने चे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी वन कर्मचारी, पशु वैद्यकीय अधिकारी यांना हि बातमी कळवली. घटनास्थळी जावून अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. मृत मेंढी ची नुकसान भरपाई मिळेपर्यंत पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी आनंदा बंडगर सरूड, रायसिंग शिसाळ, पार्थ शिसाळ चरण, शिवारे यावेळी संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.