शेतकऱ्यांचा माल हमीभावाने खरेदी करण्यासाठी आवाज उठवू- माजी मंत्री सदाभाऊ खोत
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल हमीभावाने खरेदी करण्यासंदर्भात शासन दरबारी आवाज उठवू, असे मत प्रतिपादन माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी बांबवडे इथं व्यक्त केले.

किसान आत्मनिर्भर यात्रा २४ ते २७ डिसेंबर दरम्यान रयत क्रांती संघटने च्या वतीने आयोजित केली होती. त्या अनुषंगाने हि यात्रा शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे इथं आली होती. या दरम्यान पत्रकारांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी वरील वक्तव्य केले.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले कि, देशात जे शेतकरी आंदोलन सुरु आहे, ते केवळ काही समाजद्रोही मंडळी शेतकऱ्यांमध्ये समाविष्ट झाल्यामुळे आंदोलनाला वेगळे वळण लागले आहे. महाराष्ट्रातील आणि पंजाब व हरयाणा येथील शेतकऱ्यांची परिस्थिती वेगळी आहे. तिथे बाजार समित्यांची संख्या जास्त आहे.त्यामुळे व्यापाऱ्यांची संख्या ह्या आंदोलनाला वेगळे वळण देत आहेत. परंतु पंतप्रधान मोदी साहेबांनी शेतकऱ्यांच्या हितासाठीच हि विधेयके अंमलात आणली आहेत.

दरम्यान एकेकाळची शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ, आज मात्र केंद्र शासन कसे योग्य आहे, हे सांगत आहेत. एकेकाळी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी सातत्याने झगडणारे व्यक्तिमत्व आज मात्र गप्प आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, व्यापारी जर हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणार असतील , तर याबाबत मी स्वत: व आमदार पडळकर आम्ही दोघेही याबाबत आवाज उठवू,व शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. असे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

यावेळी साळशी चे युवा कार्यकर्ते सुजय पाटील यांनी माजीमंत्री सदाभाऊ खोत,व आमदार गोपीचंद पडळकर यांचे बुके देवून स्वागत केले.
यावेळी भाजप चे मलकापूर चे नगरसेवक राजू प्रभावळकर, सुनील वाणी, विजय रेडेकर, संजय खोत, विलास राऊत, डॉ. संपत भोसले, विवेक चव्हाण, नामदेव पाटील, प्रकाश चिखलकर, सर्जेराव रेडेकर, दत्तात्रय पाटील, भगवान कापसे, संजय मिस्त्री व कार्यकर्ते उपस्थित होते,