शेतकऱ्यांसाठी १०००० कोटींचे पॅकेज मुख्यमंत्र्यांकडून जाहीर
मुुंबई.. अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई साठी महाविकास आघाडी चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. हि मदत दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल, याची दक्षता घेण्यात आली आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

यावेळी जिरायत,बागायत शेती साठी हेक्टरी ५००० /- मदत जाहीर करण्यात आली आहे. नगर विकास साठी ३०० कोटी, रस्ते,पूल, दुरुस्ती साठी २६३५ कोटी, जलसंपदा साठी १०२ कोटी, महावितरण उर्जा साठी २३९ कोटी, कृषी, व घर यासाठी ५५०० कोटी, फळबागांसाठी २५००० कोटी ची मदत जाही करण्यात आली आहे. त्याचबरोबर घरांची झालेली पडझड, मृत व्यक्तींच्या वारसांसाठी भरीव मदत, त्याचप्रमाणे ज्या मालकांच्या पशुधनाचे नुकसान झाले आहे ,त्यांना देखील मदत करण्यात येईल,असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान केंद्र शासनाकडून निसर्ग चक्रीवादळाचे १०६५ कोटी, पूर्व विदर्भातले पुराचे ८१४ कोटी येणे बाकी असून ,केंद्राकडून एकूण सुमारे ३८००० कोटी येणे अद्याप बाकी आहे. अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
