श्री नंदकुमार शेळके सर यांची गटशिक्षणाधिकारी पदी पदोन्नती
बांबवडे : श्री नंदकुमार शेळके सर यांची शाहुवाडी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी पदी पदोन्नती झाली असून, आज खऱ्या अर्थाने शाहुवाडी तालुक्याला मान मिळाला आहे. गटशिक्षणाधिकारी श्री नंदकुमार शेळके सर यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन. तसेच फ्रेंडस् मोबाईल शॉपी चे मालक अमोल लाटकर यांच्याकडूनही त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

नंदकुमार शेळके सर म्हणजे सह्याद्री च्या मातीतला हाडाचा शिक्षक म्हटल्यास वावगे ठरू नये. इतिहासाची खऱ्या अर्थाने जाण असलेलं हे व्यक्तिमत्व आपल्या शाहुवाडी तालुक्यातील डोणोली येथील कायमचे रहिवासी आहेत. एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. प्रामाणिकपणे शिक्षकी पेशा सांभाळणारे हे व्यक्तिमत्व आज आपल्याच तालुक्यात गटशिक्षणाधिकारी या उच्च पदावर विराजमान होत आहे. याचं आम्हा तालुकावासीयांना निश्चितच कौतुक आणि अभिमान आहे.

त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा