श्री. बी. वाय. पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल च्या प्राचार्य पदी सौ. संस्कृती सचिन पाटील यांची निवड
बांबवडे : श्री. बी. वाय. पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल सरूड तालुका शाहुवाडी च्या प्राचार्य पदी सौ. संस्कृती सचिन पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यासाठी त्यांच्यावर सरूड , बांबवडे पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
माजी आमदार श्री. बाबासाहेब पाटील सरुडकर शिक्षण संस्थे अंतर्गत श्री. बी.वाय. पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल सरूड कार्यरत आहे. या शाळेच्या प्राचार्य पदी सौ.संस्कृती सचिन पाटील यांची निवड झाली आहे. याप्रीत्यर्थ माजी आमदार श्री बाबासाहेब पाटील सरुडकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या सत्कार प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संचालक श्री. युवराज पाटील, इंदिरा हायस्कूल चे प्राचार्य श्री. जी.एस.पाटील सर, संस्था अधीक्षक श्री. सुनील रोडे सर , कोल्हापूर जिल्हा क्रीडा विभागाचे अधिकारी श्री. अरुण पाटील साहेब व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री बाबासाहेब पाटील सरुडकर दादा आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात म्हणाले कि, तालुक्यातील गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्यामुळे श्री. बी.वाय. पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल चे नाव गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकावर यावे, यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करावेत, असे आवाहन देखील यावेळी दादांनी केले.
यावेळी प्राचार्य जी.एस. पाटील सर मार्गदर्शन करताना म्हणाले कि, प्राचार्य पद हे जबाबदारीचे पद आहे. शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शैक्षणिक, प्रशासकीय , शिस्ती चे व सामाजिक कार्य , या सर्व गोष्टींचे नियोजन व अंमलबजावणी करणे, हीच खरी प्राचार्याची भूमिका असते. कामकाजात कधी काही अडचणी आल्यास आमच्याशी संपर्क साधा. आम्ही योग्य मार्गदर्शन सहित आपल्या पाठीशी उभे राहू.
या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील शिक्षकवृंद, कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रम हसत खेळत उत्साहात संपन्न झाला.