श्री महादेवराव पाटील साळशीकर माजी सभापती आंतरराज्य पुरस्काराने सन्मानित
बांबवडे : साळशी तालुका शाहुवाडी येथील जिल्हा परिषद कोल्हापूर चे माजी शिक्षण सभापती श्री महादेवराव ज्ञानदेव पाटील यांना आंतरराज्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या गौरवाबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने या राजकारण कुशल व्यक्तिमत्वाचे मनापासून हार्दिक अभिनंदन.

कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तीन राज्यांत सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांसाठी हा पुरस्कार नॅशनल रुरल डेव्हलपमेंटफौंडेशन (रजि.) बेळगाव, व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव यांच्यावतीने हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा तो पुरस्कार साळशी चे माजी सभापती महादेवराव ज्ञानदेव पाटील साळशीकर यांना मिळाला आहे. गेली पन्नास वर्षे हे व्यक्तिमत्व सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात कार्यरत आहे. राजकारणाबरोबरच समाजकारणाला केंद्रीय बिंदू मानून त्यांनी आजवर आपले कर्तुत्व केले आहे.

माजी खासदार स्व. उदयसिंगराव गायकवाड यांचे ते खंदे समर्थक आहेत. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांचे देखील ते कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या कुशल आणि सामाजिक कार्याने प्रभावित होवून, त्यांना हा आंतरराज्य पुरस्कार देण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे सचिन पाटील, इंद्रजीत पाटील, दिपक पाटील, संदीप पाटील, प्रदीप बडे, दिनकर पाटील, शरद राबाडे, दिलीप राबाडे, गोरक्ष राबाडे, आणि ग्रामस्थ या सर्वांनी श्री महादेवराव पाटील साळशीकर माजी सभापती यांचे अभिनंदन केले आहे.