educationalसामाजिक

श्री यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी या शाळेत स्व. यशवंत दादांचा पाचवा स्मृतिदिन संपन्न


बांबवडे : डोणोली तालुका शाहुवाडी येथील श्री यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी या शाळेत मा. आम. स्व. यशवंत एकनाथ पाटील दादा यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच शिक्षणाची भगीरथांची गंगा अशीच पुढे वाहत नेणार, याचा यावेळी दृढनिश्चय या मान्यवरांच्या वतीने करण्यात आला.


पन्हाळा – गगनबावडा मतदार संघाचे मा.आम. स्व. यशवंत एकनाथ पाटील (दादा ) यांचा १७ मे २०२२ रोजी पाचवा स्मृतिदिन डोणोली तालुका शाहुवाडी येथील श्री यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी या शाळेत संपन्न झाला.


शिक्षणाची गंगा आपल्या दऱ्या-खोऱ्यांच्या तालुका असलेल्या प्रत्येक गावात पोहचली पाहिजे, तसेच सर्व जाती धर्मांच्या लोकांपर्यंत त्याचबरोबर गोर-गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना देखील हे शिक्षण मिळावे. तालुक्याच्या कड्या-कपारींपर्यंत हे शिक्षण पोहचले पाहिजे. हे स्व.आम. यशवंत दादांचे स्वप्न होते. ते स्वप्न त्यांचे नातू आणि यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव डॉ. जयंत पाटील हे पूर्ण करीत आहेत. म्हणूनच डोणोली सारख्या गावात हि संस्था आपल्या ज्ञानदानाचे काम करीत आहे.


स्व. दादांच्या कार्याचा वसा आणि वारसा घेवून, डॉ. जयंत पाटील साहेब यांनी हि शिक्षणाची गंगा खळखळून वहात ठेवण्याचे काम अविरतपणे सुरु ठेवले आहे. यामुळे दादांनी पाहिलेली स्वप्ने निरंतरपणे पूर्णत्वास नेण्याचे काम डॉ. जयंत पाटील साहेब अविरतपणे करीत आहेत.
डोणोली येथील श्री यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी या शाळेच्या माध्यमातून उत्तम शिक्षण देण्याचे काम सुरु आहे.


यावेळी शाळेचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पालक व विद्यार्थी वृंद यांच्यावतीने दि.१७ मे रोजी स्व.आम. यशवंत दादा यांना त्यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन केले. त्याचबरोबर त्यांच्या विचारांना उजाळा देवून, शिक्षणाची गंगा अविरतपणे वाहती ठेवण्याचा त्यांनी दृढनिश्चय केला आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!