श्री यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी डोणोली च्या वतीने गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न
बांबवडे : यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचालित,श्री यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज डोणोली इथं गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी शाहुवाडी तालुका गटशिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद कोल्हापूर च्या उपशिक्षणाधिकारी सौ जयश्री जाधव मॅडम, व शाहुवाडी तालुक्याचे माजी गटशिक्षणाधिकारी नंदकुमार शेळके, तसेच बांबवडे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सदाशिव थोरात, कार्यक्रमास अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी १० वी च्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम सादर केले. यामध्ये नाटक, कविता, गोष्ट, गाणी, प्रश्नमंजुषा असे विविध उपक्रम सादर केले. यामध्ये १० वीचे वर्गशिक्षक सौ स्नेहा भंडारे मॅडम, व सांस्कृतिक समिती प्रमुख श्री संग्राम सुतार सर व इतर शिक्षकांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

उपस्थित अतिथी मान्यवरांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे, तसेच शाळेचे आपल्या मनोगतातून कौतुक केले. तसेच सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. शाळेचे सचिव डॉ.जयंत पाटील सर, तसेच प्राचार्य सचिन जद सर यांनी सुद्धा विद्यार्थी व शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक सौ. आरती वास्कर यांनी केले. पाहुण्यांची ओळख धनश्री घाटगे या दहावी च्या विद्यार्थिनीने करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक दहावीची विद्यार्थिनी कुमारी सिद्धी चौगुले हिने केले.
कार्यक्रमाचे आभार दहावीची विद्यार्थिनी कुमारी कृष्णा दळवी हिने मानले.