श्री युवराज काटकर (बाबा ) यांची मनसे च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती
मलकापूर : शाहुवाडी तालुक्यतील माजी जिल्हा परिषद जयवंतराव काटकर यांचे चिरंजीव युवराज काटकर उर्फ बाबा यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोल्हापूर उपजिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. असे मनसे चे कोल्हापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष जयराज लांडगे यांनी जाहीर केले आहे. युवराज काटकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह मनसे त प्रवेश कर्ते झाले आहेत. त्यांच्या पाठीशी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख जयवंतराव काटकर हे आपल्या गटासह मनसे त दाखल झाले आहेत.

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत जयराज लांडगे म्हणाले कि, मनसे हा महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घेणारा पक्ष आहे. पक्षप्रमुखांनी राज्याच्या हितासाठी अनेक योजनांचा आराखडा बनविला असून, यामध्ये बेरोजगार, युवक, सामान्य जनता आणि महाराष्ट्राच्या हिताच्या अनेक योजनांचा समावेश आहे. युवकांसाठी सिक्युरिटी फोर्स निर्माण करून, बाहेरून आलेल्या मंडळींपेक्षा महाराष्ट्रातील युवक चांगली सुरक्षा पुरवू शकतो, असा त्यांना विश्वास आहे.

दरम्यान शिवसेनेत बॅकफुट वर गेलेल्या जयवंतराव काटकर यांनी अनेक वर्षे शिवसेनेत काढून सुद्धा, नंतर आलेल्या मंडळींना शिवसेनेने संधी दिली. यामुळे भविष्यात याच गोष्टीची पुनरावृत्ती होणार का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मनसे त कार्यकर्त्याची योग्य किमत केली जाते, असे लांडगे यांनी सांगितले.

तालुक्यातील जनतेसाठी विविध योजना त्यांना मिळवून देण्यासाठी हि संघटना निश्चितच आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरेल, व सर्व सामान्यांची बाजू घेतली जाईल. दरम्यान सत्तेचे विकेंद्रीकरण करणे, हि महत्वाची बाब आहे. यासाठी भविष्यातील शाहुवाडी तालुक्यातील स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मनसे स्वबळावर लढवेल, असेही श्री लांडगे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना श्री जयवंतराव काटकर म्हणाले कि, भविष्यात लागणाऱ्या मलकापूर नगरपरिषद ची निवडणूक मनसे लढविणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना गावागावात पोहचविण्याचा आमचा मानस आहे.

यावेळी मनसे चे नूतन उपजिल्हाध्यक्ष युवराज काटकर म्हणाले कि, भविष्यात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरू, आणि सामान्य जनता केंद्रबिंदू मानून पक्ष वाढीचे काम जिल्हाभर करू, असेही युवराज उर्फ बाबा काटकर यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष गजानन जाधव, सहकार सेना जिल्हाध्यक्ष मनोहर जोशी, इचलकरंजी शहर अध्यक्ष प्रताप पाटील, शाहुवाडी तालुकाध्यक्ष धनाजी आगलावे, उपाध्यक्ष प्रवीण कांबळे, माजी अध्यक्ष बाळासाहेब कदम, पन्हाळा तालुकाध्यक्ष विशाल मोरे, शाहुवाडी तालुका सचिव सतीश तांदळे, सानपाडा विभाग उपाध्यक्ष संजय पाटील, कोल्हापूर जिल्हा सचिव जतीन होरणे, श्री पांडुरंग वग्रे, कुणाल काळे, पन्हाळा तालुका सचिव लखन लादे, रोहित जांभळे, सुरज गोसावी, शाहुवाडी तालुका उपाध्यक्ष संदीप कांबळे, रविराज जाधव, शाहुवाडी विकास सेवा संस्थेचे चेअरमन नामदेव बांद्रे व कार्यकर्ते उपस्थित होते.