श्री रेणुकादेवी दुध संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र योगीराजसिंह गायकवाड यांच्या हस्ते स्वीकारले
बांबवडे प्रतिनिधी : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं श्री रेणुकादेवी सह. दुध व्याव. संस्था मंजूर झाली असून, या संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र युवा नेते माजी जिल्हा परिषद सदस्य योगीराजसिंह गायकवाड यांच्या हस्ते स्वीकारण्यात आले.

यावेळी संस्थेचे चेअरमन श्री विद्यानंद यादव यांच्यासहित संतोष कांबळे, रोहित कांबळे, सुमित काळे, प्रमोद घाटगे यांच्यासहित मान्यवर उपस्थित होते.