श्री विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
बांबवडे : माजी जि.प. सदस्य श्री विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात सुमारे १५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरात पंचक्रोशीतील अनेक तरुणांनी रक्तदान केले. या शिबिरात राष्ट्रीय खेळाडू साईवर्धन विक्रमसिंह पाटील यांनी सुद्धा रक्तदान केले. साईवर्धन हे गोळा फेक (शॉट पूट ) खेळामध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळले आहेत. यावेळी सौ माधुरी संजय यादव या गृहिणी ने देखील रक्तदान केले. हि गोष्ट समाजासाठी निश्चितच अनुकरणीय आहे.
आजचा वाढदिवस सोहळा संस्मरणीय ठरला आहे. कारण यावेळी फार मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती.