श्री स्वागत तोडकर यांचे औषध विना आयुष्य विषयावर श्री समर्थ कृपा हॉल मध्ये दि.२० सप्टेंबर रोजी व्याख्यान बांबवडे : अथणी शुगर्स-उदय साखर गणेश मंडळ- बांबवडे-सोनवडे
तालुका शाहुवाडी यांच्यावतीने प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ श्री स्वागत तोडकर साहेब यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान बांबवडे येथील उद्योगपती तानाजीराव चौगुले यांच्या पेट्रोल पंपासमोर असलेल्या श्री समर्थ कृपा मल्टीपर्पज हॉल इथं बुधवार दि.२० सप्टेंबर २०२३ रोजी दु. दोन वाजता आयोजित करण्यात आले आहे. तरी या सुवर्णसंधी चा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र प्रा. लि. हि संस्था सुप्रसिद्ध असून,श्री स्वागत तोडकर हे या संस्थेचे संस्थापक आहेत. औषध विना आयुष्य माणसाला जगता आले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. यावर ते घरगुती उपचार आणि सवयी स्वत:ला लावून घेतल्या कि, हे जमू शकते, केवळ निसर्गाच्या उपचारांवर आपण अनेक व्याधींपासून मुक्त होवू शकतो. यासाठीच ग्रामस्थांनी सदर चे व्याख्यान श्रवण केल्यास त्यांना त्यांच्या आयुष्यात खूप उपयोग होवू शकतो.
त्यामुळे सदर च्या व्याख्यानाचा ग्रामस्थांनी सहकुटुंब लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.