राजकीयसामाजिक

संकल्प विकसित भारत रथ यात्रा सध्या शाहुवाडी तालुक्यात कार्यरत : तालुकाध्यक्ष पांडुरंग वग्रे

बांबवडे : संकल्प विकसित भारत रथ यात्रा सध्या शाहुवाडी तालुक्यात कार्यरत असून ५६ दिवस हि रथयात्रा शाहुवाडी तालुक्यातील विविध गावातून फिरत आहे. या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे केंद्र शासनाचे विविध प्रकल्प जनतेसाठी सुरु असून त्याची माहिती देण्यासाठी फिरत आहे. अशी माहिती भाजप चे शाहुवाडी तालुका अध्यक्ष पांडुरंग वग्रे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

केंद्र शासनाने जनतेसाठी कोणकोणत्या योजना आणल्या आहेत. त्याचा सामान्य जनतेला कसा फायदा होतोय. तसेच या योजना जनतेसाठी कशा उपयुक्त आहेत. याची माहिती देखील या रथयात्रेच्या माध्यमातून सामन्य जनतेला दिली जात आहे.


हि रथयात्रा तालुक्यात ५६ दिवस फिरून जनतेला केंद्र शासनाच्या योजना आणि त्यांचे फायदे समजावून सांगत आहेत. त्यामुळे पक्षाची कामे सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचा हा प्रयत्न आहे. असे देखील श्री पांडुरंग वग्रे यांनी सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!