संजय गांधी निराधार समिती च्या शाहुवाडी तालुका सदस्य पदी शित्तूर तर्फ वारुण चे किरण पाटील यांची वर्णी
शित्तूर तर्फ वारुण : शित्तूर तर्फ वारुण तालुका शाहुवाडी येथील किरण संभाजी पाटील यांची संजय गांधी निराधार समिती च्या शाहुवाडी तालुक्याच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल सा. शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने हार्दिक अभिनंदन.
श्री किरण संभाजी पाटील हे शित्तूर तर्फ वारुण येथील कर्णसिंह गायकवाड गटाचे समर्थक आहेत. त्यांचे वडील संभाजी पाटील हे सुद्धा स्व. संजयदादा यांचे खंदे समर्थक होते. त्यानंतर त्यांचे चिरंजीव किरण यांनी कर्णसिंह यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. इथं झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कर्णसिंह गायकवाड व जनसुराज्य शक्ती पक्षाची इथं युती होती. यामध्ये किरण पाटील यांची ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाली. त्यांचे सामाजिक कार्य व त्यांचा गट सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. याबाबत कर्णसिंह गायकवाड व आमदार विनय कोरे यांनी यांनी सुचविल्यानुसार पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या सूचनेनुसार त्यांची संजय गांधी निराधार समिती च्या शाहुवाडी तालुका सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.