संजय गांधी निराधार समिती च्या शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी भीमराव पाटील यांची नियुक्ती
शित्तूर तर्फ वारुण ( शिवाजी नांगरे ) : सोंडोली तालुका शाहुवाडी चे सरपंच श्री भीमराव बाळू पाटील यांची संजय गांधी निराधार समिती च्या शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल तालुक्यातील विविध स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सा. शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने श्री भीमराव पाटील यांचे या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन.
श्री भीमराव बाळू पाटील हे शिवसेने चे मा. आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांचे खंदे समर्थक आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी यश मिळविले असून ,त्यांची सरपंच पदी वर्णी लागली आहे. त्यांची सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक कार्य तालुक्याच्या उत्तर भागात उल्लेखनीय आहे. म्हणूनच त्यांचे नाव मा.आमदार सत्यजित पाटील यांनी या संजय गांधी निराधार समिती च्या अध्यक्ष पदासाठी सुचविलेले होते. त्यांच्या या सूचनेनुसार पालकमंत्री श्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी या नावाची शिफारस केली. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हि नियुक्ती करण्यात आली आहे.