संजीवनी फौंडेशन च्या वतीने नवरात्रोत्सव मध्ये फराळ वाटप
बांबवडे : डॉ. स्वाती पाटील यांच्या संजीवनी फौंडेशन च्या सखी मंच च्या वतीने गत वर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव च्या उपवास धारकांसाठी शाहुवाडी तालुक्यातून फराळाचे साहित्य वितरीत करण्यात आले.
डॉ.दीपक पाटील यांच्या प्रेरणेतून संजीवनी फौंडेशन ची निर्मिती झाली आहे. समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत सेवा पोहोचावी, त्यांना बळ मिळावे, अशी या फौंडेशन ची अपेक्षा आहे
त्यासाठी हे फौंडेशन महिलांसाठी राबत आहे. तसेच गरजूंसाठी सुद्धा या फौंडेशन चा हातभार लागत आहे. पन्हाळा तालुक्यात या फौंडेशन चा या अगोदर सेवा सोहळा सुरु होता. गत वर्षीपासून शाहुवाडी तालुक्यात सुद्धा हा सेवा सोहळा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाही शाहुवाडी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात फराळाचे वाटप करण्यात आले. बांबवडे नगरीत सुद्धा फराळाचे वाटप झाले. इथ भाजप चे तालुकाध्यक्ष श्री पांडुरंग वग्रे आबा यांच्या सहकार्याने स्वप्नाली शेळके, विमल कुंभार यांच्या हस्ते हे फराळ वाटप करण्यात आले.