संत रविदास फौंडेशन चे शैक्षणिक साहित्य वाटप म्हणजे सामाजिक बांधिलकी
शित्तूर तर्फ वारुण : शाहुवाडी तालुक्याचे उत्तर टोक असलेल्या भागात संत रविदास चर्मकार युवा फौंडेशन च्या वतीने कोरोना ने मृत पावलेल्या पालकांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

विरळे तालुका शाहुवाडी इथं संत रविदास फौंडेशन ने शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत, डोंगरी भागात नवा पायंडा पाडला आहे. फौंडेशन चे संस्थापक श्री दत्ताभाऊ कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. कोरोना काळात मृत पावलेल्या पालकांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप फौंडेशन चे शाहुवाडी तालुका अध्यक्ष उमेशभाऊ कारंडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कै. आनंदा पोवार यांच्या मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

यावेळी शाहुवाडी तालुका सेवाभावी संस्था उपाध्यक्ष गणपती लोकरे, संपर्क प्रमुख ईश्वर लोकरे, ग्राम अध्यक्ष जगन्नाथ रोकडे, बाळासाहेब जगताप,आणि कार्यकर्ते उपस्थित होते.