‘सतेज पाटील’ यांची विधान परिषद वर बिनविरोध निवड
बांबवडे : कोल्हापुरात चुरशीची आणि इर्षेची ठरत असलेली विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. येथील पारंपारिक विरोधक असलेले महाडिक कुटुंबाने उमेदवारी दाखल केलेले अमल महाडिक व डमी अर्ज दाखल केलेल्या शौमिका महाडिक या दोन्ही उमेदवारांनी आपली माघार घेतली असून, यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले सतेज पाटील यांची बिनविरोध निवडीसाठी मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान सदरच्या राजकारणासाठी दिल्ली हून सूत्रे हलली असून, कॉंग्रेस भाजप शिवसेना अशी त्रिसूत्री तयार झाली आहे, असे समजते. सदरच्या नव्याने तयार झालेल्या समझोत्या एक्स्प्रेस साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे या एक्स्प्रेस चे चालक असावेत, अशीही माहिती मिळत आहे.

एकंदरीत पालकमंत्री सतेज पाटील यांची विधान परिषद वर बिनविरोध निवड होणार आहे.