राजकीयसामाजिक

सर्वसामान्यांच्या विकासाचे दिशा दर्शक नामदेवराव खोत यांचे अल्पश:आजाराने निधन : रक्षाविसर्जन दि.३ जाने.२०२४

बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील विकासकामांचे दिशा दर्शक असलेले नामदेवराव खोत ( आबा ) यांचे अल्पश: आजाराने काल दि.१ जानेवारी २०२४ रोजी निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मुकुंद पवार आणि कुटुंबियांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन. त्यांचा रक्षाविसर्जन विधी उद्या बुधवार दि.३ जानेवारी रोजी कडवे इथं आहे.
नामदेवराव खोत आणि सर्व सामन्यांचे आबा आज हयात नाहीत. याचे दु:ख त्यांच्या कुटुंबियांइतकेच वाडी वस्ती वरील जनतेला देखील आहे. कारण इथल्या विकासाचे ते दिशादर्शक होते. कोणत्या गावात कशाची गरज आहे. याची खडा न खडा माहिती आबांना होती. म्हणूनच त्यांना स्व. आमदार संजयसिंह गायकवाड यांच्या काळात मिनी आमदार म्हणून संबोधले जायचे. तसेच कोणत्या गावात किती निधी खर्च झाला. आणि किती शिल्लक आहे, याची माहिती त्यांना तोंडपाठ असायची. म्हणूनच त्यांना चालतेबोलते कॅलक्यूलेटर म्हटले जायचे.
असे नामदेवराव खोत उर्फ आबा यांचे निधन सर्वसामान्य जनतेला चटका लावून गेले आहे. त्यांच्या पश्चात मुली, दोन मुलगे सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी सभापती विजयराव खोत यांचे ते वडील होत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!