सर्व सामान्य कार्यकर्त्याची प्रती संजय दादांना साद
बांबवडे :कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती च्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. याच अनुषंगाने बांबवडे जिल्हापरिषद मतदार संघातील बांबवडे पंचायत समिती गणासाठी श्री संदीप केमाडे या सर्व सामान्य कुटुंबातील उमेदवार पुढे येत आहेत. परंपरागत उमेदवार सोडून नवा चेहरा पुढे येत असताना पाहायला मिळत आहे.
श्री संदीप केमाडे हे स्व. आमदार संजय दादा गटावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. म्हणूनच त्यांनी गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड सरकार यांच्याकडे या उमेदवारीची मागणी केली आहे. यासाठी थेरगाव सैदापूर बांबवडे या पंचक्रोशीतून ग्रामस्थ एकत्र आले होते. सर्वसामान्य स्तरातून हि पुढे येणारी उमेदवारी एका सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारी ठरणार आहे. स्व. आमदार संजय दादा यांनी सुद्धा जे कार्यकर्त्यांचे मोहोळ तयार केले होते, ते सुद्धा सामान्य जनतेतून तयार केले होते. गरीबाच्या घोंगड्यावर बसून चटणी भाकर खाणारा आमदार त्यावेळी पहिलाच होता. त्यानंतर तसा माणूस मिळणे कठीणच. अशा परिस्थितीत त्या माणसाने मंत्री पदाला ठोकरून तालुक्यातील जनतेसाठी शासनाकडे पाणी मागितले. असा लोकप्रतिनिधी मिळणे अवघडच आहे. त्यांच्याच पावलावर पाउल ठेवत संदीप सारखे एक तरुण व्यक्तिमत्व लोकप्रतिनिधित्व करण्यास पुढे सरसावले आहे. अशा तरुण मंडळींना उमेदवारी मिळाल्यास तालुक्यात एक नवा शिरस्ता निर्माण होईल. लोकप्रतिनिधित्व करण्यासाठी केवळ पैसाच लागतो, असे नव्हे, तर तेवढी इच्छा शक्ती सुद्धा लागते. आणि याच माध्यमातून पुन्हा एकदा संजय दादा सर्वसामान्य जनतेला कर्णसिंह यांच्या रूपातून पहावयास मिळतील.

