सवते इथे वीज पडून जखमी महिलांपैकी लक्ष्मी पाटील यांचे निधन
बांबवडे : सवते तालुका शाहुवाडी इथं वीज पडून गंभीर जखमी झालेल्या दोन महिलांपैकी लक्ष्मी शामराव पाटील वय ५२ वर्षे यांचे निधन झाले आहे. त्यांना शवविच्छेदन साठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तर दुसरी महिला सुनंदा कृष्णा पाटील वय ४८ वर्षे यांना कोल्हापूर येथील सीपीआर. रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले.

दरम्यान घटनास्थळास माजी आरोग्य सभापती हंबीरराव पाटील बापू यांनी भेट दिली. तसेच सरूड आरोग्यवर्धिनी केंद्रास सुद्धा भेट दिली. यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.पी. जेडगे उपस्थित नव्हते. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे श्री पाटील यांनी सांगितले.