सहा.पोलीस निरीक्षक भीमराव कांबळे यांचे अल्पश: आजाराने निधन
बांबवडे : वाघवे तालुका पन्हाळा येथील मुंबईस्थित सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव शामराव कांबळे वय ६८ वर्षे यांचे अल्पश: आजाराने मुंबईत निधन झाले.
मुंबई डिलाईल रोड ना.म. जोशी मार्ग इथं त्यांनी पन्नास वर्षे हून अधिक काळ वास्तव्य केले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेवून त्यांनी प्रथम पोलीस दलात नोकरी पत्करली. त्यांची नोकरीतील दक्षता व प्रामाणिकपणा या गुणांमुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदापर्यंत मजल मारली.
कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी सेवा निवृत्ती स्वीकारली. मुंबई इथं बुधवार दि.२३ जुलै रोजी विक्रोळी येथील गोदरेज हॉस्पिटल मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिण असा मोठा परिवार आहे. जलदान विधी रविवार दि.२७ जुलै रोजी वाघवे इथं संपन्न झाला. सामाजिक कार्यकर्ते उत्तम वाघमारे ( सोनवडे तालुका शाहुवाडी) , व बाजीराव घोलप सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक ( शिवारे ) यांचे ते आते भाऊ होते.