सहा विकासकामांसाठी १५ कोटी मंजूर- भाजप नेते सत्यजित देशमुख
शिराळा प्रतिनिधी :-
शिराळा विधानसभा मतदारसंघातील रस्ते, पुल कामांसाठी राज्याच्या हिवाळी अधिवेशना मध्ये पुरवणी मागण्या मध्ये 15 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील रस्त्यावर चार पूल व दोन रस्ते अशी सहा कामे मंजूर झाली आहेत.अशी माहिती भाजपा नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची संचालक सत्यजित देशमुख यांनी दिली.
यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले :- शिराळा विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पुल बांधकामांसाठी राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विकास कामांची मागणी केली होती. यामध्ये मतदारसंघाच्या विकासासाठी 15 कोटी रुपयाचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. तर राज्य सरकारने शिराळा येथे महत्त्वाच्या व्यक्तींसाठी शासकीय विश्रामगृह बांधणे, दोन कोटी 22 लाख 50 हजार या कामासाठी इतका निधी मंजूर केला आहे. तर करुंगली येथे वारणा नदी व संरक्षण भिंत बांधणे. या कामासाठी 67 लाख 12 हजार इतका निधी आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकार्यातून मंजूर झाला आहे. असेही सत्यजित देशमुख यांनी सांगितले.
रस्ते व पूल वाकूर्डे बुद्रुक,पडवळवाडी, रस्ता ग्रा.मा क्रमांक 86 वर लहान मुलाचे बांधकाम करणे. व रस्ता मजबुतीकरण करणे. दोन कोटी रुपये, येळापूर समता नगर, दीपक वाडी रस्ता ग्रामीण क्रमांक 118 मेणी ओढ्यावर लहान पुल बांधणे व रस्ता मजबुतीकरण करणे दोन कोटी रुपये, माणिकवाडी, रेठरे धरण,मरोळोबाचीवाडी ऐतवडे बुद्रुक, करंजवडे,रेठरे धरण गावाजवळ लहान पूल बांधणे दोन कोटी 50 लक्ष, चिकुर्डे भोसले वस्ती रस्ता क्रमांक 102 वर लहान पुल बांधणे दोन कोटी, चिकुर्डे करंजवडे रस्ता ग्रा. मा क्रमांक 10 ची सुधारणा करणे व लहान पूल बांधणे 5 कोटी,कामेरी खांबे मळा इस्लामपूर रस्ता क्रमांक 57 सुधारणा करणे 1 कोटी 50 लक्ष इतका निधी मंजूर झाला आहे.
हा निधी मंजूर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री आमचे नेते,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कामगार मंत्री सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विशेष सहकार्याने हा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती सत्यजित देशमुख यांनी दिली.