सह्याद्रीच्या मानबिंदुंचा अमृतमहोत्सव : मा.सुरेशराव गायकवाड
बांबवडे : शाहुवाडी तालुक्याचे सुपुत्र आणि सह्याद्रीचा मानबिंदू असलेले कडवे गावाचे वैभव आणि महाराष्ट्राच्या तिजोरीला सन्मान प्राप्त करून देणारे, मा. सुरेशराव गायकवाड साहेब यांना त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सा. शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने, तसेच त्यांच्या मित्रपरिवाराचे नेतृत्व करणारे मा.बापूसाहेब कांबळे सर आणि मित्र परिवार यांच्या वतीनेही उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा…
त्यांच्या या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त काही शब्द्कुंज…
शाहुवाडी तालुक्याला लाभलेलं फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचं वादळ आज ७५ वर्षाचं झालं. या काळात त्यांनी निर्माण केलेलं आंबेडकरी विचारांचं तुफान केवळ शाहुवाडी तालुक्यातंच नव्हे, तर देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई त सुद्धा मानानं निवृत्तीनंतरही घोंघावतंय. हेच आपलं धन आहे, आणि हीच आपली श्रीमंती.
गायकवाड साहेब म्हणजे, तालुक्याचे मंत्रालयातील आधारस्तंभ म्हणावयास हरकत नाही. तालुक्यातील गावांच्या अनेक विकासकामांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. कारण ते महाराष्ट्राचे वित्तीय सल्लागार म्हणून मंत्रालयात काम पाहत होते.
साहेबांचा स्वभाव आणि मदत करण्याची वृत्ती सर्वश्रुतच आहे. मुंबई म्हटलं कि, केवळ मराठी येवून चालत नाही, तिथे हिंदी इंग्लिश या भाषा अवगत असणं, गरजेचं होतं. अशावेळी तालुक्यातील लोकांना साहेबांचा आधार मोठा होता.
साहेबांचा आम्हाला लाभलेला किरकोळ सहवासंच, त्यांच्या आयुष्यातील परोपकारी वृत्तीचं दर्शन घडवतो. त्यांच्यासारख्या मातब्बर आणि मुरलेला अर्थतज्ञ शाहुवाडी तालुक्यासाठी एक अनमोल रत्नंच म्हणावे लागेल.
साहेबांना पुनश्च त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा…