सातवे इथं नागपंचमी निमित्त श्री आळोबा नाथांची पूजा संपन्न
कोडोली प्रतिनिधी : सातवे तालुका पन्हाळा इथं नागपंचमी निमित्त श्री आळोबानाथांची पूजा बांधण्यात आली आहे. यानिमित्त पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने आले होते. अशी माहिती येथील पुजारी सागर गुरव यांनी दिली.

आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात पांडुरंगाची पूजा बांधली जाते. कोल्हापुरात महालक्ष्मी ची पूजा बांधली जाते. जोतीबा डोंगरावर ज्योतिर्लिंगाची पूजा बांधली जाते. त्याच पद्धतीने सातवे येथील श्री आळोबा नाथांची पूजा आषाढी एकादशी निमित्त बांधण्यात आली होती.

सातवे चे आळोबानाथ हे दैवत जागृत देवस्थान असून, भाविकांची यावर अपार श्रद्धा आहे. याच अनुषंगाने नागपंचमी निमित्त श्री आळोबा नाथांची पूजा बांधण्यात आली होती. यावेळी अनेक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

हि पूजा सागर नामदेव गुरव यांनी भाविकांच्या सहकार्याने हि पूजा बांधली आहे. या पूजेसाठी आर्थिक सहकार्य हरिओम दुध संस्थेचे चेअरमन श्री पोपट धामणे, तसेच श्री धनाजी काशीद सातवे यांनी केले आहे. भाविकांनी अशा उपक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन देखील पुजारी सागर गुरव यांनी केले.