सामाजिक बांधीलकीचं वाण उचलणारं व्यक्तिमत्व : रमेश नाईक
मलकापूर प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी ची जर खऱ्या अर्थाने जाणीव असेल, तर हे समाजाच्या बांधीलकीचं वाण कसंही उचलता येतं. याचं उदाहरण ठरत आहेत, मलकापूर तालुका शाहुवाडी येथील महादेव तरुण मंडळाचे अध्यक्ष रमेश दादा नाईक. आपल्या उच्च शिक्षणाचा फायदा समाजाला करून देण्यासाठी हे व्यक्तिमत्व यशस्वीरीत्या प्रयत्न करीत आहे. याबाबत त्यांच्याविषयी समाजातून कृतज्ञता दर्शविली जात आहे.

रमेश नाईक यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. निराधार पेन्शन योजना, विधवा परितक्त्या योजना, अशा योजना त्यांनी समाजापर्यंत पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांनी केलेले हे सहकार्य विनामुल्य केले आहे. शासन समाजासाठी अनेक योजना राबवतं, परंतु त्या लोकांपर्यंत पोहाचातातंच,असे नाही. यामागे लोकांमध्ये असलेला अशिक्षितपणा , त्याचबरोबर शासनाच्या योजनांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांचा पुरवठा असेल, आणि त्यासाठी करावा लागणारा पाठपुरावा असेल. अशा विविध कारणांमुळे लोकांपर्यंत योजना पोहचत नाही. आणि खऱ्या अर्थाने गरज असून लाभार्थी या योजनांपासून वंचित राहतात.

परंतु रमेश नाईक हे एक सामाजिक व्यक्तिमत्व आहे. त्यांनी लोकांना योजना समजावून सांगितल्या. त्याबाबत कागदपत्रांचा पुरवठा केला, याचबरोबर त्या प्रस्तावाचा पाठपुरावा देखील केला. म्हणूनच अनेक लोकांना त्याचबरोबर महिलांना या योजनांचा लाभ घेता आला. यासाठी अनेकांनी कृतज्ञता म्हणून त्यांचे कौतुक केले, त्यांचा सत्कार केला.

परंतु रमेश हे सत्कारात अडकून राहणारे व्यक्तिमत्व नसून, समाजाचं दुखणं त्यांना माहित आहे. यासाठी ते सातत्याने ते प्रयत्नशील असतात. आणि खऱ्या अर्थाने आपल्या उच्च शिक्षणाचा वापर त्यांनी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी केला आहे. याचबरोबर अनेक माताभगीनींना त्यांच्या हक्काच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचा त्यांचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे. अशा या व्यक्तिमत्वाचे एसपीएस न्यूज च्या वतीने अभिनंदन करीत आहोत.

याबाबत रमेश नाईक यांना तहसीलदार गुरु बिराजदार यांच्यासहित शाहुवाडी तहसील कार्यालयाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.
