सामान्य जनतेच्या प्रगतीचं गमक शिक्षण आहे – श्री स्वप्नील घोडे – पाटील
बांबवडे प्रतिनिधी : सर्व सामान्य जनतेच्या समाजाची प्रगती करायची असेल, तर या जनतेला शिक्षणाचे बाळकडू पाजणे, हि काळाची गरज आहे. त्यासाठी गोर-गरीब समाजाची मुले शैक्षणिक दृष्ट्या सुधारली पाहिजे. असे मत स्व. अशोकराव घोडे-पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि फायटर ग्रुप चे अध्यक्ष स्वप्नील घोडे-पाटील यांनी व्यक्त केले.

स्वप्नील घोडे-पाटील, फायटर ग्रयुप चे अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बांबवडे येथील प्राथमिक विद्यामंदिर, तसेच रयत शिक्षण संस्थेच्या बांबवडे तालुका शाहुवाडी येथील महात्मा गांधी विद्यालय इथं वही आणि पेन चे वाटप फायटर ग्रुप च्या वतीने करण्यात आले.

बांबवडे पंचक्रोशीत स्व. अशोकराव घोडे-पाटील यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. अशोकभाऊ समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणारे व्यक्तिमत्व होते. त्यांनी सर्व सामान्य समाजाला नेहमीच मदत केली होती. त्यांचाच वारसा स्वप्नील घोडे – पाटील आणि त्यांचे सहकारी फायटर ग्रुप च्या माध्यमातून पुढे चालवीत आहे.

स्वप्नील यांच्या रूपाने नवे उदयोन्मुख समाजाभिमुख व्यक्तिमत्व निर्माण होत आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. तसेच फायटर ग्रुप च्यावतीने देखील उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा श्री. प्रवीण जानकर आणि सहकारी मंडळींनी दिल्या आहेत.
यावेळी वैभव नारकर, प्रवीण जानकर, सुयश घोडे – पाटील, अमर निकम यांच्यासहित अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.